+91 90712 92315 | contact@brahmarishishermitage.org | Find Us
दिव्य आध्यात्मिक शक्तींचा अनुभव घ्या
ब्रम्हर्षिज हर्मिटेज
Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis 
                    Divine Soul Guru
Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis 
                    Divine Soul Guru
भगवान कल्की | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

भगवान कल्की

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

पुराणांमध्ये म्हटल्याप्रमाणे, ह्या पृथ्वीवरील सर्व नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि सनातन धर्माची स्थापना करण्यासाठी कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णूंचा दहावा अवतार भगवान कल्की जन्म घेईल. खरंच, परमेश्वर आधीच आला आहे.

भगवान कल्की यांचा जन्म १९२४ मध्ये रहस्यमय शंबला किंवा आर्यावर्त खो-यात झाला. ते आत्ता त्यांच्या विसाव्या वर्षात आहेत कारण त्यांची कालगणना आपल्यापेक्षा वेगळी आहे. भगवान कल्कींना भगवान परशुराम आणि महर्षी अश्वत्थामा यांनी दैवी उपकरणे दिली, भगवान अंजनेय यांनी ६४ सिद्धी दिल्या, वसिष्ठ महर्षींनी वैदिक लिपी व मूल्ये, विश्वामित्र महर्षींनी विविध वैश्विक शक्ती आणि मार्कंडेय महर्षी यांनी मानवतेच्या विविध पैलूंबद्दल प्रशिक्षण दिले होते. ते शंबला येथील मुख्य मैत्रेयांपैकी एक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पंख असलेला पांढरा घोडा आणि विजेच्या वेगाने प्रवास करणारे शिंग आहे. ते त्यांचे हे वाहन काही विशिष्ट प्रसंगीच वापरतात. त्यांच्या हातात भगवान शिवांनी भेट दिलेला विद्युत स्तंभ आहे ज्याच्या काठावर माणिक आहे. ह्याचा वापर ते नकारात्मक उर्जा नष्ट करण्यासाठी करतात.

भगवान कल्किंनी एक अशी प्रतिकृती निर्माण केली की ज्याचे नाव 'कल्की संकल्पना 'असे होते. बरेच ऋषी आणि खूप सारी दैवी व्यक्तिमत्वे जी मानव रूपात आहेत, ती त्यांच्या कार्यात गुप्तपणे मदत करत असतात. वेगवेगळ्या धर्माचे अनेक अध्यात्मिक गुरुही त्यांच्या कार्यामधला भाग आहेत. त्यांच्या अंतर्गत, एका शाश्वत धर्मासह धार्मिकतेचा शाश्वत मार्ग स्थापित केला जाईल. जे लोक अधर्माने संपन्न आणि समर्थ राजेशाही जीवन जगतात ते लवकरच नष्ट होतील.

परमेश्वराचे कार्य

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

भगवान कल्कींकडे शक्तीशाली प्रकाश प्रसारकांची मोठी फौज आहे. भगवान परशुराम हे भगवान कल्कींना त्यांच्या सैन्याचा सेनापती म्हणून मदत करतात. महाअवतार, परमेश्वराचा भाऊ ह्यांच्याकडे सुद्धा शक्तीशाली ऊर्जा आहेत, ज्या त्यांना त्यांच्या कार्यात मदत करतात. शंबला येथील बाकीचे मैत्रेयही भगवान कल्कींना त्यांच्या कार्यात मदत करतात. आपल्या पृथ्वीवर कोणतीही महत्वाची कृती करण्यापूर्वी, भगवान कल्की सप्तॠषी आणि त्यांच्या महत्वाच्या सहका-यांशी चर्चा करतात.

परमेश्वराच्या हाताखाली काम करणे सोपे नाही. त्यांच्या सैन्याचा एक भाग बनणे ही काही सोपी गोष्ट नाही. सदाचाराचा मार्ग स्विकारून त्याप्रमाणे वागायला पाहिजे. कोणत्याही वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्याच्या हेतूने परमेश्वराने अनेक प्रसंगी प्रकाशाच्या शस्त्रांचा उपयोग केला आहे. त्यांनी त्यांच्या क्रांतिकारी कार्याची सुरूवात छोट्या स्वरूपात केली आहे.

कल्की संकल्पना

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

भगवान कल्किंनी एक अशी प्रतिकृती निर्माण केली की ज्याचे नाव 'कल्की संकल्पना 'असे होते. बरेच ऋषी आणि खूप सारी दैवी व्यक्तिमत्वे जी मानव रूपात आहेत, ती त्यांच्या कार्यात गुप्तपणे मदत करत असतात. वेगवेगळ्या धर्माचे अनेक अध्यात्मिक गुरुही त्यांच्या कार्यामधला भाग आहेत. त्यांच्या अंतर्गत, एका शाश्वत धर्मासह धार्मिकतेचा शाश्वत मार्ग स्थापित केला जाईल. जे लोक अधर्माने संपन्न आणि समर्थ राजेशाही जीवन जगतात ते लवकरच नष्ट होतील.

भगवान कल्किंचे सहयोगी त्यांच्या बरोबर वेगवेगळ्या देशांमध्ये काम करत आहेत आणि योग्य लोकांना सत्तेवर येण्यासाठी आर्थिक दृष्ट्या मजबूत होण्यासाठी आणि धार्मिकतेच्या मार्गावर पुढे जाण्यास मदत करत आहेत. मार्कंडेय महर्षी आणि विश्वामित्र महर्षी हे युरोप खंडात कार्यरत आहेत, शंबला मधून भगवान मैत्रेय, भगवान परशुराम आणि महर्षी अश्वत्थामा मध्य अशिया आणि आफ्रिका खंड, महर्षी वशिष्ठ, महा-अवतार, भगवान अंजनेय आणि भगवान कल्की स्वतः अशिया आणि अमेरिका खंडामधून कार्य करतात.

ह्या सगळ्या महत्वाच्या दैवी व्यक्ती सतत न थांबता कामाच्या जुन्या पद्धती बदलून जगाला बदलण्यासाठी नवीन पद्धत आणत आहेत. दर्जात्मक आर्थिक बदल हा सतत जगात घडत आहे व तसाच तो शिक्षण क्षेत्रात व राजकीय क्षेत्रातही घडतो आहे. सध्याचे औषध निर्मिती क्षेत्र हे नष्ट होणार आहे आणि उपचाराचे नवीन मार्ग व पर्यायी औषध क्षेत्र लवकरच ज्ञात होईल.

मूलभूत शिकवण

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

नेहमी सत्यवादी रहा आणि जास्त सतर्क रहा. स्वतःवर प्रेम करा.

तुमच्या कृती, विचार व भावना ह्या कायम सकारात्मक ठेवा कारण तुमच्याद्वारेच वैश्विक ऊर्जेचा प्रवाह होतो. जेव्हा तुम्हाला ह्याची जाणीव होते तेव्हा सकारात्मकता ही आणखी तीव्र होते.

अहंकार, भय, क्रोध, द्वेष, आसक्ती, लोभ, वासना आणि इच्छा यांसारख्या तुमच्या स्वतःच्या नकारात्मक गोष्टी दूर करा. त्यांना धरून राहिलात तर तुमचा नाश होईल.

वैराग्य आणि नम्रता जोपासा. सत्य, प्रेम, कृतज्ञता, संयम आणि चिकाटीचा सराव करा. आनंदी व्हा.

क्षमा करा आणि स्वीकार करा. तुम्ही जसे होऊ शकता हा विचार सोडा व तुम्ही आतापर्यंत जसे आहात तसेच रहा.

तुमच्या जीवनाचे ध्येय हे आत्मसाक्षात्कारच असले पाहिजे.

संबंधित चित्रफीत

आमचे अनुसरण करा