आत्मसाक्षात्कार | ब्रम्हर्षिज हर्मिटेज आत्मसाक्षात्कार | cyber_key_000

आत्मसाक्षात्कार


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

◘आत्मसाक्षात्कार म्हणजे आपण म्हणजे अमर्त्य आत्मा आहोत आणि प्रकाशाचे एक स्फुल्लिंग आहोत या सत्याची उकल होणे. त्यामुळे आत्मसाक्षात्कार आणि देवाला समजून घेणे हे दोन्ही एकच आहे.

◘आत्मसाक्षात्कार साधनेचे मूळ उद्दिष्ट आहे आणि मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे.

◘सर्व योग स्वत:ला किंवा आत्म्याला ईश्वराच्या साक्षात्काराचा अनुभव प्राप्त करून देतात.

◘आत्मसाक्षात्कारी व्यक्ती कधीही अस्वस्थ होत नाही आणि कुठल्याही परिस्थितीत स्वतःचा संयम ढळू देत नाही.

◘कुठलेही विषेश प्रयत्न न करता आत्मसाक्षात्कारी व्यक्ती कायम प्रेम व शांतता पसरवीत असते. अशा व्यक्तीची उपस्थिती सतत दैवी स्पंदने आसपासच्या वातावरणामधे व सभोवतालच्या लोकांमध्ये पसरवीत असते.