ओम | ऊर्जा | प्राण | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

ओम


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

ओम हा आदिम वैश्विक ध्वनी आहे, जो विश्वाच्या प्रत्येक अणूमध्ये कंपन करतो.

ओम हा अस्तित्वाच्या तीन स्पंदनशील अवस्थांचे प्रतिनिधित्व करतो. निर्मिती-अकार, निर्वाह-उकार, विघटन-मकार.

ओम हा एकाक्षरी शब्द आहे, ज्याचा उच्चार अगदी निःशब्द होऊनही सहज केला जातो.

ओम या पवित्र ध्वनीचा पुनरावृत्तीने केलेला जप हा एखाद्याला सर्वोच्च ध्यानाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी उन्नत करू शकतो.

खोल शांततेत, ओम हा मनाच्या आतून ऐकू येतो.

ऊर्जा


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

ऊर्जा ही प्रकाशाची गतिमान अथवा स्पंदनात्मक अभिव्यक्ती आहे.

ऊर्जेमध्ये प्रेम, बुद्धिमत्ता आणि शुद्धता सुद्धा येते कारण तिचा स्त्रोत प्रकाशामधून येतो.

प्रतिध्वनीच्या घनतेप्रमाणे ऊर्जा ही स्थूल किंवा सूक्ष्म असू शकते. म्हणूनच कोणत्याही निर्मितीच्या अस्तित्वामध्ये एक सूक्ष्म ऊर्जाक्षेत्र असते जे अणूपासून ता-यांपर्यंत आकाशगंगांपर्यंत आणि सूक्ष्म जगापासून ते स्थूल जगापर्यंत वाहून नेते.

विविध प्रकारांनी ऊर्जेच्या निरनिराळ्या सततच्या संयोजनामुळे निर्मितीत वैविध्यता येते,ज्यालाच माया असे म्हटले जाते.

स्थूल ऊर्जा क्षेत्र हे भौतिक वास्तविकतेला अगर स्वरूपाला सदृश प्रकटीकरण देते तर सूक्ष्म ऊर्जा क्षेत्र हे स्वर्गीय वास्तवाचे द्योतक असते.

ऊर्जा ही ५ घटकांची आहे-ईथर, हवा, अग्नी, पाणी आणि जमीन. जेव्हा हे दैवी गुणोत्तराशी जोडले जातात तेव्हा जीवन तयार होते.

ऊर्जा ही जीवनाची आणि उदरनिर्वाहाची प्राथमिक स्त्रोत आहे.

आपण अन्न, पाणी, सूर्य (प्राण) आणि ब्रम्हांड यांच्याकडून आपल्या भौतिक आणि ऐहिक शरीरासाठी, उदरनिर्वाहासाठी ऊर्जा मिळवत असतो.

साधना जितकी खोल (प्रगल्भ) असेल तितका वैश्विक ऊर्जेचा प्रवाह जास्त असतो, ज्यामुळे आपली शरीरप्रणाली शुद्ध होते आणि अध्यात्मिक प्रगती लवकर होते.

प्राण


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

प्राण ही आपल्याला सूर्याकडून प्राप्त होणारी विशेष व सूक्ष्म ऊर्जा आहे.

प्राण हे जीवन आणि आरोग्याचे लक्षण आहे.

शरीरातल्या सूक्ष्म वाहिन्या म्हणजेच नाडयांच्या जाळ्यामधून हा प्राण, प्राणमय कोषात शोषला जातो.

आपल्या शरीरात ७२००० ऊर्जावहन करणा-या नळ्या आहेत. हे प्राणिक ऊर्जेचे द्वार आहे.

ऊर्जा पातळी, जीवनशक्ती दीर्घायुष्य यांचा थेट संबंध श्वासोच्छवासाच्या पद्धतीशी आहे आणि म्हणूनच प्राणायाम ही एक महत्वाची अध्यात्मिक साधना आहे.

जर आपण आपल्या प्राणावर नियंत्रण ठेवू शकलो तर आपण आपले जीवन आणि जीवनात येणा-या परिस्थिती नियंत्रित करू शकतो.