प्राणायाम | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

प्राणायाम


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

अखिल चराचरात भरून राहिलेली सूक्ष्म वैश्विक ऊर्जा म्हणजे प्राण. श्वास घेतांना आपल्याला ही प्राणशक्ती सूर्याकडून मिळते. जिवंतपणाचा प्रमुख स्रोत आणि पुरावा म्हणजे श्वास! अष्टांग योगाची चौथी शाखा असलेला प्राणायाम म्हणजे, श्वास घेण्याच्या पद्धतीचं नियमन करण्याचा रियाज.

आपण श्वासाद्वारे आत घेतलेल्या प्राणाचं पंचप्राणांत विभाजन होतं. हे पाच प्राण म्हणजे, प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान.

आपल्या अवघ्या शरीर प्रणालीत ऊर्जावहन करणाऱ्या सूक्ष्म नलिकांच्या जाळ्यातून म्हणजेच नाड्यांमधून वहाणाऱ्या प्राणाचा स्वीकार प्राणमय कोषात होतो. शरीरात असलेल्या बहात्तर हजार नाडयांपैकी, 101 प्रमुख आणि बाकीच्या दुय्यम नाड्या आहेत.

मेरुदंडाच्या मुळापासून मस्तकापर्यंत वहाणाऱ्या 3 प्रमुख नाड्या, इडा मेरुदंडाच्या डावीकडून, पिंगला उजवीकडून, तर सुषुम्ना मेरुदंडाच्या मध्यभागावरल्या सात चक्रांतून वहाते.

या तिन्ही नाड्यांमधला अवरोध दूर करून त्यात सुप्तावस्थेत वसत असलेल्या ऊर्जा कार्यान्वित करणं हे प्राणायामाचं अंतिम उद्दिष्ट आहे. यामुळे उच्च पातळीचे आध्यात्मिक अनुभव येऊन शेवटी आत्मसाक्षात्कार शक्य होईल.

प्राणयामामुळे आपला प्राणमय कोष, पूर्णपणे कार्यक्षम आणि सुयोग्य होतो. यामुळे शरीरात उत्तमप्रकारे शोषला जाणारा प्राण, अतिशय परिणामकारकरित्या शरीरातल्या बहात्तर हजार नाड्यांची उत्तम प्रकारे शुद्धी करतो.

प्राणयामात पूरक, रेचक आणि कुंभक समाविष्ट आहे. कुंभकात आपली छाती, चुंबकीय क्षेत्रात हवेच्या झोताच्या जोरावर फिरणाऱ्या चाकासारखं काम करून आत आलेली ऊर्जा फुफ्फुसांत प्रसारित करते. ही फुफ्फुसं ऊर्जा निर्मिती करणाऱ्या यंत्राचं काम करतात.

निर्माण झालेली ऊर्जा चक्रांमध्ये साठवली जाते. ही चक्रं या उर्जेचं आवश्यक ते रूपांतरण करून संपूर्ण शरीरात वितरीत करतात.

मेरुदंडाच्या मुळापासून मस्तकापर्यंत वहाणाऱ्या 3 प्रमुख नाड्या, इडा मेरुदंडाच्या डावीकडून, पिंगला उजवीकडून, तर सुषुम्ना मेरुदंडाच्या मध्यभागावरल्या सात चक्रांतून वहाते. या तिन्ही नाड्यांमधला अवरोध दूर करून त्यात सुप्तावस्थेत वसत असलेल्या ऊर्जा कार्यान्वित करणं हे प्राणायामाचं अंतिम उद्दिष्ट आहे. यामुळे उच्च पातळीचे आध्यात्मिक अनुभव येऊन शेवटी आत्मसाक्षात्कार शक्य होईल.

प्राणायाम पध्दत | सराव


दोन्ही नाकपुड्यांनी पूरक (श्वास घ्या) करा. मिटलेल्या डोळ्यांसमोर शुभ्र किंवा सोनेरी प्रकाशाची कल्पना करा.

आता कुंभक कराल म्हणजे श्वास रोखाल तेव्हाच आत श्वास आणि प्रकाश शरीरातल्या प्रत्येक पेशीत आणि पंचकोषात एकेक करून पोचवा आणि संपूर्ण शरीर प्रकाशमान झाले असल्याचा अनुभव घ्या.

श्वास पूर्णपणे सोडा.

परत श्वास रोखा. मग स्टेप २ मध्ये जितका वेळ घेतला तेवढाच वेळ श्वास रोखून धरा.

वर दिलेल्या ४ पायऱ्यांचा मिळून एक संच होतो. परत प्रत्येक पायरीला तेवढाच वेळ देऊन आणखी एक संच करा. काहीही खाल्ल्यावर कमीतकमी 2 तासानंतरच तुम्ही हा प्राणायाम करू शकता.

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

कोण


८ वर्षांवरील कोणीही.

कुठे


घरात किंवा घराबाहेर कुठेही

कधी


दिवसाच्या कुठल्याही वेळी, पण शक्यतो सकाळी लवकर.

वेळ


कमीतकमी ५ मिनिटं.

फायदे


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

नियमितपणे प्राणायाम केल्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे:

आपल्या प्रकृतीची आणि आयुष्याची प्रत सुधारते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, भरपूर प्राणवायू मिळतो आणि ऊर्जा वाढते.

मज्जातंतूविषयक विकार बरे होतात.

आरोग्यमय दीर्घायुष्य आणि समृद्ध जीवनशक्ती लाभते.

क्रोध आणि चिंता ताब्यात येतात.

थकवा, काळज्या आणि ताण नाहीसा होतो.

वाचन सुरू ठेवा ...

झोपेची गुणवत्ता सुधारते

मन शांत, पण जागरूक होतं.

मन चटकन शांत करणं जमू लागतं.

ध्यान करतांना मनातले विचार किंवा त्यांचा वेग कमी होतो.

संपूर्ण नाडीशुद्धी होते.

नाडी प्रणाली आणि पंचकोष सबल होतात.

अंतर्ज्ञानासारख्या शरीरातल्या सुप्त शक्ती काम करू लागतात.

परमेश्वराशी एकतानता साधण्यासाठी मदत होते.

आत्मसाक्षात्कार, जे आपलं अंतिम ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी प्राणायाम निश्चितपणे मदत करतो.


मार्गदर्शक तत्त्वे


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

एखाद्या आसनावर, सुखासनात ताठ बसा.

पाठीचा कणा ताठ आणि हनुवटी जमिनीला समांतर ठेवा.

चेहेरा, खांदे आणि संपूर्ण शरीर सैल सोडा.

शक्य तितक्या संथपणे पूरक, रेचक, कुंभक करा.

या तिन्हींसाठी पूरक, रेचक, कुंभक कटाक्षाने समान वेळ द्या.

सराव सहजतेने करा, कोणताही ताण किंवा जबरदस्तीने करु नका.