मार्गदर्शक दिवे | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

मार्गदर्शक दिवे


ब्रह्मर्षींचा हर्मिटेज म्हणजे ऋषी आणि सिद्धांचा एकत्रित मार्ग असल्याने दैवी व प्रख्यात व्यक्तित्वाने त्याचे रक्षण आणि मार्गदर्शन केले जाते. हे अतुलनीय सूक्ष्म स्तरांवरील गुरु मानवी माध्यमाद्वारे आपल्या जवळच्या अति दुर्मिळ अध्यात्मिक ऊर्जा, उच्च प्रकारचे ज्ञान, ध्यानाच्या प्रगत अशा सराव पद्धती आणि अध्यात्मिक तंत्रे सर्वांना देत असतात. ह्या ब्रम्हर्षी आश्रमाचे संस्थापक ऋषितुल्य व्यक्तिमत्व देवात्मानंद शंबला हे आम्हाला गुरु म्हणून लाभले आहेत.

ध्यानाचे सर्व वर्ग, ऊर्जा समन्वयित करण्याची सत्रे, अध्यात्मिक सहली किंवा कोणतेही महत्वाचे कार्यक्रम हे आमच्या गुरूंच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने, सूक्ष्म स्तरावरील उपस्थितीने आणि अद्वितीय कृपेने केले जातात.

आपल्याला ह्या निगर्वी गुरूंची महानता जितकी माहिती होईल त्यापेक्षा जास्त ती अज्ञात राहते. त्यांची करुणा, त्यांच्या कामाचे प्रमाण, त्यांची नम्रता, वचनबद्धता आणि त्यांचे समर्पण हे सर्व अतुलनीय आहे. हे गुरु अथवा स्वामी आपल्यासाठी ईश्वरी रूपे आहेत. लोकांच्या व ग्रहांच्या अध्यात्मिक स्थितीचे पुनरूज्जीवन करण्याच्या आपल्या अमर्याद उत्कटतेने चाललेले हे ज्ञानी व आत्मसाक्षात्कारी गुरु आपले मार्गदर्शक दिवे आहेत.

त्यांची चरित्रे ही सामान्य माणसाला प्रेरणा देणारी भक्कम स्रोत आहेत.

ऋषी आणि सिद्धांच्या पवित्र चरणी आमचे विनम्र अभिवादन.

आपल्याला ह्या निगर्वी गुरूंची महानता जितकी माहिती होईल त्यापेक्षा जास्त ती अज्ञात राहते. त्यांची करुणा, त्यांच्या कामाचे प्रमाण, त्यांची नम्रता, वचनबद्धता आणि त्यांचे समर्पण हे सर्व अतुलनीय आहे. हे गुरु अथवा स्वामी आपल्यासाठी ईश्वरी रूपे आहेत. लोकांच्या व ग्रहांच्या अध्यात्मिक स्थितीचे पुनरूज्जीवन करण्याच्या आपल्या अमर्याद उत्कटतेने चाललेले हे ज्ञानी व आत्मसाक्षात्कारी गुरु आपले मार्गदर्शक दिवे आहेत.त्यांची चरित्रे ही सामान्य माणसाला प्रेरणा देणारी भक्कम स्रोत आहेत.