+91 90712 92315 | contact@brahmarishishermitage.org | Find Us
दिव्य आध्यात्मिक शक्तींचा अनुभव घ्या
ब्रम्हर्षिज हर्मिटेज
Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis 
                    Divine Soul Guru
Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis 
                    Divine Soul Guru
सूर्यनमस्कार | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

सूर्यनमस्कार

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

सूर्य हा प्राणाचा मुख्य स्त्रोत आहे-जीवनाचा स्रोत आहे. सूर्यनमस्कार एक योगिक व्यायाम आहे, ज्यायोगे आपण प्राणशक्ती प्रवाहित करून शरीरात आत्मसात करू शकतो. त्यामुळे आपले शरीर ऊर्जेचा स्वीकार करण्यास तयार होते. गुरुकुलात सुरवातीला फक्त योगासनं आणि सूर्यनमस्कार शिकवले जात कारण, निरोगी मन व शरीरासाठी ते आवश्यक आहे.

सूर्यनमस्कारात १२ आसनं समाविष्ट आहेत. शारीरिक व्यायामापेक्षाही एक अतिशय शक्तिशाली क्रिया आहे, यामध्ये श्वास व उच्छवास करताना त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ह्यामुळे संपूर्ण नाडी प्रणालीचे पुनरुज्जीवन होते. शारीरिक व सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर. सूर्यनमस्काराचा नियमित आणि प्रभावी सराव आपल्या सर्व आरोग्यविषयक समस्यांची काळजी घेतो आणि आपल्या दैनंदिन ध्यानाला ही खूप मदत करतो.

सराव

एका दिवसात किमान तेरा नमस्कार आपण घालू शकतो. हळूहळू आपण ही नमस्कारांची संख्या वाढवू शकतो. सिद्ध पुरुष म्हणतात १०८ सूर्यनमस्कार केल्याने ती व्यक्ती सर्व आजारापासून मुक्त होते. प्रत्येक नमस्काराच्या वेळी जर आपण ओम मंत्राचा जप केला तर आवश्यक ऊर्जा आपल्या मज्जासंस्थे मध्ये चांगल्या प्रकारे वाढते.

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

कोण

८ वर्षांवरील कोणीही.

कुठे

घरात किंवा घराबाहेर कुठेही

कधी

दिवसाच्या कुठल्याही वेळी, पण शक्यतो सकाळी लवकर.

फायदे

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

सूर्यनमस्कार नियमित आणि योग्य प्रकारे केल्याने खाली दिल्याप्रमाणे फायदे होतात :

सांधे, मणके आणि मज्जासंस्थेशी संबंधित आरोग्याच्या समस्या सुधारतात.

दीर्घायुष्य लाभते.

आपला आत्मविश्‍वास व आशावाद वृद्धिंगत होतो.

श्र्वसनाच्या तक्रारींवर नियंत्रण मिळवता येते.

प्राणमय कोष शक्तिशाली होतो.

शरीराच्या ग्रंथी उत्तेजित होतात.

वाचन सुरू ठेवा ...

शरीरातील चक्रे ही सक्रिय होतात.

रक्त प्रवाह सुरळीत होतो व त्यामुळे हृदयाचे कार्य नीट राहायला मदत होते.

आभा तेजस्वी होऊन चेहऱ्यावर चमक येते.

ताण हलका होतो.

सर्जनशीलता, भेदभाव आणि बौद्धिक क्षमता वाढवते.

शरीर लवचिक व सुदृढ होते.

वजन कमी करण्यास मदत होते.

मार्गदर्शक तत्त्वे

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

दिवसा कोणत्याही वेळी अनशापोटी सूर्यनमस्कार घालायला हरकत नाही. तथापि पोट रिकामे असताना सूर्योदयाच्या वेळी सकाळी लवकर सूर्यनमस्कार घालावेत किंवा अन्न घेतल्यावर ३ तासांनी आणि पाणी घेतल्यावर अर्धा ते एक तासाने सराव करावा.

दुपारी बारापर्यंत पूर्वेकडे तोंड करून आणि दुपारी बारा ते सूर्यास्तापर्यंत उत्तरेकडे तोंड करून सूर्यनमस्कार करावेत. सूर्यास्तानंतर नमस्कार घालण्याचे टाळावे.

आपण घरात किंवा बाहेर कोठेही नमस्कार घातले तरी सूर्यापासून प्राणशक्ती तेवढीच शोषून घेऊ शकतो.

सूर्यनमस्कारानंतर आलेला घाम टॉवेलने पुसण्या ऐवजी तो शरीरात जीरू द्यावा.

नमस्काराच्या सरावा नंतर पंधरा मिनिटांनी पाणी प्यावे.

सूर्यनमस्कारा नंतर ४५ मिनिटांनी आपण आंघोळ करू शकतो अन्यथा, मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

⚠️ज्यांना हृदय, फुप्फुसे, किडनी, मेंदू, पाठीचा कणा आणि रक्तदाब यासारख्या समस्या आहेत, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच नमस्कार घालावेत. तसेच गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या स्त्रिया आणि ज्या व्यक्तींवर नजीकच्या काळात कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनीही डॉक्टरांची परवानगी घेऊनच नमस्कार करावेत.

सूर्यनमस्कार अनुभवी योग शिक्षकाकडून शिकावेत त्यामुळे योग्य आसनस्थिती कळते आणि पूर्ण फायदाही मिळतो.

संबंधित चित्रफीत

आमचे अनुसरण करा