अद्ययावत | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

अद्ययावत


  • सप्टेंबर 20 - ऑक्टोबर 1, 2023

    चार धाम यात्रा

    श्री देवात्मानंद शंबला यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ६० सदस्यांनी (ध्यान न करणारे आणि ध्यान करणारे) गुरुंसह चार धाम यात्रेत सहभाग घेतला होता. विविध शक्तिशाली दैवी ऊर्जा केंद्रांना भेट देण्याची संधी या सप्टेंबर महिन्यातील चार धाम यात्रेत या साधकांना मिळाली. ही यात्रा खास कर्मदहनासाठी होती. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ याव्यतिरिक्त उत्तरकाशी, धारीदेवी मंदिर, रुद्र प्रयाग, व्यास गुहा आणि वशिष्ठ गुहा या ठिकाणांना भेट दिली.

  • जुलै 3, 2023

    गुरुपौर्णिमा उत्सव

    गुरुपौर्णिमा, ज्याला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते, एक पारंपारिक उत्सव आहे. हा उत्सव ज्ञानी किंवा गुरूंना समर्पित आहे. जेव्हा साधक त्यांच्या अध्यात्मिक गुरूंना आदर आणि कृतज्ञता अर्पण करतात, तेव्हा त्यांच्या जीवनातील हा सर्वात शुभ दिवस असतो. हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आषाढ महिन्यात शुद्ध ऊर्जा थेट परब्रम्ह लोकातून उतरतात. यावर्षी सोमवार दिनांक ३ जुलै रोजी विवेकानंद धाम येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा दिवस अत्यंत पवित्र पद्धतीने साजरा करण्यात आला.

  • मे 20 - 22, 2023

    तपस - स्तर १, (तुकडी २) | अखंड ध्यान (भगवान कल्की जयंती)

    मे २० व २१ रोजी, या दोन दिवसांमध्ये वरील उपक्रम राबवला गेला. या कार्यक्रमा दरम्यान श्री देवात्मानंद शंबला यांनी विशेष ध्यान करवून घेतले. व्यायाम, क्रिया, योगासने, सूर्यनमस्कार, पूर्वा ध्यान क्रिया या पूर्वी शिकवलेल्या पद्धतीमध्ये सुधारणा केल्या गेल्या. २२ मे रोजी सकाळी ६.३० ते दुपारी १२.३० अखंड ध्यान घेतले गेले. या दिवशी भगवान कल्की जयंती असल्यामुळे, हा दिवस अतिशय शुभ होता.

  • मे 18, 2023

    गुरुजी कृष्णानंद जयंती

    विवेकानंद धाम येथे १८ मे रोजी, गुरुदेव कृष्णानंद यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ११.३०- ते दुपारी १.०० या वेळात विशेष ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. श्री देवात्मानंद शंबला यांनी ध्यान मार्गातील साधकांशी ऑनलाइन संपर्क साधला आणि सगळ्यांना आशीर्वाद दिला.