प्रकाश | आत्मा | गुरु | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

प्रकाश


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

निर्मितीचा स्त्रोत प्रकाश आहे. प्रकाशाच्या मितीला परब्रम्हलोक असे म्हणतात.

प्रकाशापासून अब्जावधी आकाशगंगा, विविध पृथ्वी व अनेक प्रकारचे जीव विकसित झाले.

प्रकाश स्वतःबरोबर निःस्वार्थ प्रेम, सहानुभुती, शांती, आनंद, अद्वितीय बुद्धिमत्ता, पवित्र्य, शक्ती, प्राणशक्ती, अशा अनेक आंतरिक गोष्टी बरोबर घेऊन येतो.

प्रकाश सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञ आहे.

प्रकाश अपरिवर्तनीय व कालातीत आहे हे सत्य आहे.

आपण आत्मा म्हणून उतरण्यापूर्वी प्रकाशाच्या बरोबर होतो, म्हणून प्रकाश हे आपले उगमस्थान आहे.

या भौतिक क्षेत्रात दैवी प्रकाश दिसु शकत नाही कारण तो सतत सूक्ष्म असतो. तथापि, हा खोल ध्यानात जाणवतो आणि पाहिलाही जाऊ शकतो.

प्रकाश सर्वांना निरोगी बनवितो.

प्रकाश हाच ईश्वर आहे.

आत्मा


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

आत्मा हा परमात्म्याचा अमर्त्य भाग आहे.

प्रेम, शांती, पावित्र्य या सारखे प्रकाशाचे सगळे पैलू आत्म्यामध्ये असतात कारण आत्मा हा प्रकाशाच्या प्रदेशातून भूतलावर उतरलेला प्रकाशाचाच एक कण आहे.

सृष्टीचा अनुभव घेणं हे आत्म्याचं कार्य असतं.

आपल्या छातीच्या मध्यभागी आनंद कोषात आपला आत्मा स्थित असतो.

सृष्टी अनुभवण्यासाठी आत्म्याला शरीराची मदत लागते म्हणून शरीर हे आत्म्याचं वाहक असतं.

आत्मा चिरंतन असतो त्यामुळे शरीराचा नाश झाला तरीही आत्म्याचं अस्तित्व कायम रहातं.

आत्मा त्याच्या मूलस्रोताशी म्हणजेच प्रकाशाशी एकरुप झाला की त्याचा प्रवास कायमचा संपतो.

सद्सद्विवेकबुद्धी हा आत्म्याचा आवाज आहे.

आपण सगळे आत्मे आहोत.

गुरु


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

आत्मसाक्षात्कार झालेली मार्गदर्शक व्यक्ती म्हणजे गुरु, जी आपल्याला परत आपल्या मूळ स्वरूपाकडे म्हणजेच प्रकाशाकडे घेऊन जाते.

गुरुंना संपूर्ण सत्याचं ज्ञान असतं आणि ते अज्ञानाचा अंध:कार नाहीसा करतात.

गुरू आपल्याला धर्माचं ज्ञान देऊन त्या मार्गाकडे नेतात.

गुरु आपल्याला साधनेच्या मार्गावर नेऊन आपण पूर्णपणे स्वावलंबी आणि सक्षम होईपर्यंत मदत करतात.

कुणावरही कुठलीही गोष्ट लादून नव्हे तर उदाहरण देऊन गुरु मार्गदर्शन करतात.

प्रेरणा, उत्तेजन आणि शक्ती यांचा अखंड स्रोत म्हणजे गुरु!

गुरु म्हणजे प्रकाशाकडे नेणारा सर्वात सोप्पा मार्ग !

ज्या वेळी साधक अध्यात्म मार्गावर चालण्यासाठी पूर्णपणे सक्षम होतो, तेव्हांच गुरु त्याच्या समोर प्रकट होतात.

गुरु म्हणजे प्रकाशाचं मूर्त स्वरुप !