सकारात्मकता | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

सकारात्मकता


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

सकारात्मकता म्हणजे नकारात्मकतेचे गुण जाणीव पूर्वक आणि सातत्याने,प्रयत्नपूर्वक बदलणे. सकारात्मकता म्हणजे निरपेक्ष प्रेम,आनंद व सुसंवाद जीवनात आणणे.

सकारात्मकतेचा उद्देश असा, की आपली तामसिक व राजसिक वृत्ती बदलून तिचे रूपांतर सात्त्विक वृत्तीत करणे.

सकारात्मकतेमुळे आपला जीवनाकडे व जीवनात येणाऱ्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन परिपक्व होतो. सकारात्मकतेमुळे आपले चांगले गुण वृद्धिंगत होतात व आपले उत्तम गुण दिसू लागतात.

सकारात्मकता म्हणजे केवळ सकारात्मक विचार करणे एवढेच नसून प्रयत्नपूर्वक मानसिक,शारीरिक व बौद्धिक अशा सगळ्या स्तरांवर हा बदल करणे. यात नकारात्मक गुण काढून, सकारात्मक गुण जोपासणे या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे.

वाचन सुरू ठेवा ...

ध्यान आणि सकारात्मकता हे एकमेकांशी जोडलेले आहे, दोन्ही एकमेकांना मदत व आधार देतात. जेव्हा कठीण व परीक्षेचा काळ असतो तेंव्हा सकारात्मकतेचे पालन करण्यासाठी ध्यान आपल्याला आंतरिक शक्ती व इच्छाशक्ती पुरवते. सकारात्मकतेची आवर्तने आपल्याला चांगल्या प्रतीचे ध्यान व समाधीचा अनुभव घेण्यासाठी मदत करतात. हे लक्षात ठेवा की ध्यान आणि सकारात्मकतेच्या एकत्रित प्रयत्नांनीच आपण आपल्या मधील षडरिपूंचा नाश करू शकतो.

सकारात्मकता सत्वगुण आणते तर ध्यानाची प्रक्रिया आपल्याला सर्व गुणांच्या पलीकडे जाण्यास मदत करते आणि आपल्याला अंतिम मुक्ती मिळवण्यासाठी पात्र बनवते म्हणून ध्यान व सकारात्मकता या दोन्ही गोष्टींना समान महत्व दिले पाहिजे व त्यांचा एकत्रितपणे सराव केला पाहिजे. ते साधनेच्या दोन डोळ्यांसारखे आहेत जे आपल्याला अध्यात्मिक व भौतिक समृद्धीसाठी संपूर्ण व संतुलित दृष्टी देतात.

असे अनेक मार्ग आहेत ज्याने आपण स्वतःला सकारात्मक बनवू शकतो. सकारात्मकतेला कुठलीही मर्याद नाही.खालील दिलेले अनेक सिद्ध मार्ग आहेत ज्यांचा उपयोग कोणीही,कधीही, कुठेही करू शकतो.

सकारात्मकता म्हणजे केवळ सकारात्मक विचार करणे एवढेच नसून प्रयत्नपूर्वक मानसिक,शारीरिक व बौद्धिक अशा सगळ्या स्तरांवर हा बदल करणे. यात नकारात्मक गुण काढून, सकारात्मक गुण जोपासणे या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. असे अनेक मार्ग आहेत ज्याने आपण स्वतःला सकारात्मक बनवू शकतो. सकारात्मकतेला कुठलीही मर्याद नाही.खालील दिलेले अनेक सिद्ध मार्ग आहेत ज्यांचा उपयोग कोणीही,कधीही, कुठेही करू शकतो.


वाचण्यासाठी प्रत्येक लिंक वर क्लिक करा

यम म्हणजे स्वसंयमासाठी असलेले नियम, जे रोजच्या जगण्यात इतरांशी संवाद साधतांना अंगिकारायचे असतात. ही खरंतर वैश्विक मार्गदर्शक तत्वं आहेत. यांना स्थळ, काळ आणि परिस्थितीची सीमा नाही. इथे पुन्हां ५ विहित (ठरलेले) नियम आहेत.

अहिंसा
कोणत्याही प्रकारच्या, म्हणजेच वैचारिक, शाब्दिक किंवा प्रत्यक्ष हिंसेचा संपूर्ण अभाव म्हणजे अहिंसा. यात स्वतःच्या बाबतीत कठोर न होणेही अंतर्भूत आहे.

सत्य
सदैव, कुठल्याही परिस्थितीत आपला खरेपणा टिकवून ठेवणं, कुठल्या प्रकारच्या खोटेपणाला थारा न देणं म्हणजे संपूर्ण सत्य.

आस्तेय
वस्तु, नाती, ज्ञान, कल्पना इत्यादीं पैकी कुठल्याही प्रकारची चोरी न करणं म्हणजे आस्तेय.

ब्रह्मचर्य
सदोदित परमात्म्याशी एकतानता साधणं, लैंगिक संयम पाळणं म्हणजे ब्रह्मचर्य.

अपरिग्रह
मालकी हक्काची भावना, वस्तूंचा संचय करण्याची वृत्ती, लोभीपणा या सर्वांपासून दूर राहणे म्हणजे अपरिग्रह.

नियम हे व्यक्तिगत पातळीवर पाळायचे असतात. याचे ५ प्रकार आहेत.

शौच
यात व्यक्तीची अंतर्बाह्य शुद्धी अभिप्रेत आहे. बाह्य शुद्धीत आपल्या शरीराची आणि भोवतालच्या परिसराची स्वच्छता येते. तर आपले विचार आणि भावना शुद्ध ठेवणं म्हणजे अंतर्शुद्धी.

संतोष
तृप्ती आणि शांत मन यामुळे जे समाधान मिळतं ते म्हणजे संतोष.

तपस्
अत्यंत खडतर ध्यानसाधना म्हणजे तपस्. हे बाह्य आणि अंतर्गत अश्या दोन्ही प्रकारचं असू शकतं. पंचेंद्रियं बाह्य निर्बंधांद्वारे ताब्यात ठेवणं हे बाह्य तपस् झालं तर, चिकाटीने कितीही गोंधळात शांत रहाणं, त्यागवृत्ती अंगी बाणवणं हे अंतर्गत तपस् ! शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती एकमेकांना साह्यभूत होतात.

स्वाध्याय
आपलं आपण केलेलं अध्ययन म्हणजे स्वाध्याय. आणि हे अध्ययन फक्त पवित्र साहित्यापुरतंच मर्यादित नाही, तर आपली वागणूक, आपल्या सुप्त मनांत येणाऱ्या बऱ्या वाईट विचार आणि विकारांकडे बारीक नजरेने बघणं ही स्वाध्यायात समाविष्ट आहे.

ईश्वर प्रणिधान
ईश्वर, ऋषी किंवा आपल्या गुरूंना संपूर्ण शरण जाणं, आपलं कर्मफल आशिर्वाद म्हणून स्वीकारणं म्हणजे ईश्वर प्रणिधान.

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                        Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

क्षमा करणे अगर क्षमा मागणे ही एक छोटीशी कृती असली तरी अध्यात्मिक जीवन यशस्वीरित्या व्यतीत करण्याची ही गुरुकिल्ली आहे.

त्यामुळे आपल्या मार्गातील अनेक अडथळे दूर होतात. तसेच अनेक खोलवर रुजलेल्या जखमा बऱ्या होतात व भूतकाळापासून मुक्ती मिळते. ज्या भूतकाळात अनेक खोलवर रुजलेल्या जखमांच्या रूपातील काटे राग, विश्वासघात, आणि दुःख यातना यांची बीजे सुप्त अवस्थेत पडून असतात.

रोजच्या सरावासाठी सोपी मार्गदर्शक तत्वे -

ज्यांनी तुम्हाला दुःख दिले आहे त्यांना क्षमा करा आणि ती गोष्ट तुमच्या मनातून काढून टाका.

ज्या लोकांना तुम्ही भूतकाळात कळत नकळत त्रास दिला असेल त्या सर्वांची तुम्ही माफी मागा व क्षमा याचना करा.

भूतकाळात घडलेल्या कोणत्याही नकारात्मक कृत्यांबद्दल आणि ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही त्याबद्दल स्वतःला आणि इतरांना क्षमा करा.

दैनंदिन करावयाच्या ध्यानानंतर आपले मन शांत असते, अशा वेळी क्षमा करावी व क्षमा मागावी, म्हणजे हा सराव प्रभावी होईल.

असा सराव केल्याने आपल्या जीवनातील अडथळे जाऊन आपल्या साधनेत जलद प्रगती होते व आयुष्यात शाश्वत सकारात्मकता येते.

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                        Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

आशीर्वाद म्हणजे परमत्म्याची कृपा आपल्या माध्यमातून इतरांना पोचवण्याची कृती. ही सर्वाधिक सहज व सर्वश्रेष्ठ अशी कृती आहे. जेंव्हा आपण एकमेकांना मनापासून आशीर्वाद देतो तेंव्हाच आपण परमेश्वराचे शुद्ध साधन बनतो.

स्वतःला आशिर्वाद देणंही खरंतर आपल्याला शक्य आहे. आपल्याकडे जे नाही त्याबद्दल तक्रार करण्यापेक्षा, जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहावं.एकदा का ही 'असण्या'बद्दलची कृतज्ञता मनांत रुजली, की आयुष्य आमूलाग्र बदलेल आणि आपल्याला अतिशय समृद्ध, आनंदी आणि संपूर्ण आयुष्य जगता येईल. रोजच्या जगण्यात, आपल्या पाठीवर असलेला परमेश्वराचा अदृश्य हात जेव्हां आपल्याला दिसतो, तेव्हां विनम्र होऊन जायला होतं. वडीलधारी माणसं, हितचिंतक, गुरू, परमेश्वर या सगळ्यांच्या आशिर्वादामुळे सहृदयता आणि समपर्णाची भावना याने आपलं आयुष्य समृद्ध होऊ जातं.

ध्यानानंतर आपलं मन अतिशय शांत झालेलं असतं. ही वेळ आशिर्वाद देण्यासाठी सुयोग्य आहे.

रोजच्या सरावासाठी सोपी मार्गदर्शक तत्वे -

इतरांबरोबर स्वतःलाही आशिर्वाद द्या.

तुम्हांला आणि इतर सगळ्यांना उत्तम प्रकृती, दीर्घायुष्य, समृद्धी, विद्वत्ता, शहाणपण, समाधान आणि शांती लाभावी अशी इच्छा व्यक्त करा.

आपलं कुटुंब, आपली जवळची माणसं, सहकारी, आपला देश आणि जागतिक नेत्यांनाही आपण आशिर्वाद देऊ शकतो.

अगदी मनापासून आपण जेव्हां हे करू तेव्हां सगळा क्षुद्रपणा, मतभेद, संघर्ष संपुष्टात येऊन आपण दिव्यत्वात विलीन होऊ.

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                        Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

संकल्प किंवा दृढ निश्चय करणे म्हणजे इच्छा पूर्ण होईपर्यंत, आपल्या इच्छापूर्ण विचारांना मानसिक बळकटी देणे. ही मनापासून एखाद्या वस्तू किंवा पदार्थापर्यंत जाण्याची एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. हे सामान्यत: शक्तिशाली चित्राफितीसह जोडलेले आहे.

संकल्प हा एक शक्तिशाली सकारात्मक सराव आहे. कोणताही नकारात्मक विचार किंवा सवय ही या सरावाने बदलू शकते. हे आपल्या अवचेतन मनापर्यंत पोहोचून काम करते म्हणूनच ह्याचा सराव जेंव्हा मन शांत असते म्हणजे ध्यान झाल्यावर करता येते.

ही संकल्प शक्ती साधक कोणतेही अध्यात्मिक ध्येय साध्य करण्यासाठी, निरोगी शरीर प्राप्त करण्यासाठी, मनःशांतीसाठी आणि अखेरीस आत्मसाक्षात्कारासाठी वापरू शकतो.

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                        Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

किसी एक विषय पर स्थिर रहकर बिना किसी पक्षपात के और खुले विचारों के साथ गहराई से सोचने का भाव चिंतन कहलाता है। यह हमारे मन का विस्तार करता है ताकि हम अधिक और नया ज्ञान प्राप्त कर सकें। चिंतन हमें विनयशील बनाता है और हमें नए विचारों और ज्ञान के लिए एक माध्यम बनने में मदद करता है ।

चिंतन संकीर्ण मानसिकता और सोच की रूढ़िवादी प्रकृति को हटाता है। यह हमारे अंदर नए दृष्टिकोण लाता है ताकि हम किसी भी विषय को अलग ढंग से योजित कर सकें।

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                        Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

आत्मपरिक्षण म्हणजे आपलेच विचार, शब्द आणि कृतींचे साक्षीभावानी अवलोकन करायचे. त्यामध्ये सतत दुरुस्ती करायची, परत आत्मपरीक्षण करायचे, परत दुरुस्तीची गरज असल्यास ती करायची, हे असे जोपर्यंत आपण पूर्ण सकारात्मक होत नाही तोपर्यंत करत रहायचे.

आत्मपरीक्षण हा सकारात्मक होण्याचा खूप प्रभावी मार्ग आहे. तो अवलंबिल्याशिवाय आपण यम नियम पाळूच शकत नाही. तसेच आपल्यातील षडरिपू जावू शकत नाही.

आत्मपरीक्षण ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. साधकाने एक रोजनिशी स्वतःजवळ बाळगून रोज आपण कुठे चुकलो व काय काय स्वभावामध्ये दुरुस्त्या केल्या याची टिपणे नोंदवावी. त्यामुळे आपल्यालाच आपली प्रगती लक्षात येईल. आत्मपरीक्षणामुळे आपली अध्यात्मिक प्रगती लवकर साध्य होते व आपले शरीर, मन, बुद्धी ह्यांच्यात सुसंवाद निर्माण होऊन ते आत्मसाक्षात्काराच्या आपल्या अंतिम उद्दिष्टासाठी तयार होतात.

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                        Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

सत्संग म्हणजे सात्विक लोकांच्या सहवासात राहाणे. सत्संग लोकांच्या छोट्या किंवा मोठ्या समूहा बरोबर होऊ शकतो.

वेळोवेळी गुरू आणि पवित्र लोकांचा सत्संग ईश्वराशी संरेखित होण्याची अधिक संधी देतो. सत्संगामुळे आपल्या साधनेला चालना मिळते व आपण वेगाने आपल्या अध्यात्मिक सरावत प्रगती करतो. तसेच आपल्याला सामूहिक ऊर्जा, काळ व अवकाश तत्वाचा, कमी कष्टात खूप जास्त फायदा मिळतो.