शंका समाधान

शंका समाधान


1. साधनेसाठी भौतिक शरीर इतके महत्त्वाचे का असते?

भौतिक शरीराशिवाय आपण या जगात काहीही करू शकत नाही. दीर्घकाळ ध्यान करण्यासाठी व समाधीच्या उच्च टप्प्यांचा अनुभव घेण्यासाठी, साधकाला निरोगी शरीर असणे आवश्यक आहे.

2. जास्त वेळ ध्यानात बसता यावं, यासाठी कोणते आसन सर्वोत्तम आहे?

पद्मासन सर्वोत्तम आहे. सिद्धासनातही जास्त तास ध्यानात बसू शकतो. तथापि आपल्याला अनुकूल असलेल्या आसनात बसावे.

3. माझी अध्यात्मिक प्रगती होत आहे हे मला कसे कळेल?

चिंतन करा आणि सर्वांवर प्रेम करण्यास आपण सक्षम आहोत का याचा शोध घ्या. तुम्ही सगळ्यांशी एकतानता साधू शकता आहात की नाही हे बघा, अशा प्रकारे तुम्ही आपल्या प्रगतीचे आकलन करू शकता.

4. गुणवत्ता ध्यान म्हणजे काय?

ध्यान दर्जेदार होण्यासाठी, एका बिंदूवर एक ते दोन मिनिट लक्ष केंद्रित करावे. मनाला निर्विचार करणे, शरीर व मन स्थिर करणे आणि संपूर्ण प्रणालीच्या स्थिरता व ऊर्जांशी संरेखित करणे. ‌‌

5. ज्ञान प्राप्तीची पहिली पायरी कोणती?

ध्यान व सकारात्मकता.

6. दुःख काय सूचित करते?

आपण आपल्या कर्माच्या भोगातून जात आहोत आणि दिव्यत्वाला आपल्यावर काम करू देत आहोत. आपण नियमित ध्यान केल्याने व सकारात्मक विचारांमुळे दु:ख कमी करू शकतो.

7. ग्रहांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो?

कर्म आपली आहेत. ग्रह केवळ अभियांत्रिकी कार्य करत आहेत. आपण आपल्या साधनेने जर कर्म जाळली आणि आपल्यावरील कर्मांचा प्रभाव कमी केला तर ग्रहांचा प्रभावही कमी होईल. म्हणूनच मी नेहमी दर्जेदार ध्यानाचा आग्रह करतो. दर्जेदार ध्यान केल्याने आपले जीवन बदलून जाते, आपली जीवन रेषा बदलेल आणि कर्माचा मार्ग बदलेल. ध्यान आपल्याला सामर्थ्यवान व इच्छाशक्तीने युक्त बनवते आणि आयुष्यातील वाईट दिवसांमधून जाण्यासाठी मदत करते ज्यामुळे आपण कर्माच्या चक्राला भेदून बाहेर पडतो.

8. शुद्ध होण्याचा काही जलद मार्ग आहे का?

माझे गुरूजी म्हणतात, जेव्हा आपण ऊर्जा अनुभवतो, तेव्हा हे शक्य होते. मी असे म्हणीन, जेव्हा आपण परमात्म्याशी स्पष्ट व सुसंगत होऊन जीवन जगतो तेव्हा आपली शुद्धता वाढते. ध्यान केल्याने आपल्या शुध्दतेत नक्कीच वाढ होते.

9. आपण आपल्याला उच्च ऊर्जांसाठी कसे सुसज्ज करावे?

यासाठी दोनच पर्याय आहेत, ध्यान व सकारात्मकता.

10. सकारात्मकतेवर काम करण्याचा मार्ग कोणता ?

तुमच्या आयुष्यातील काही दिवसांचे निरीक्षण करा. एक नमुना समोर येईल. त्यातील एखादा समान धागा तुमच्या लक्षात येईल, जसे राग किंवा मत्सर किंवा इतर कुठलीही नकारात्मकता. त्यावर काम करा, जागृत व सतर्क रहा जेणेकरून त्याची पुनरावृत्ती होणार नाही.

11. ओम आणि अ -उ -म मध्ये काय फरक आहे ?

सत्ययुगापासून द्वापरयुगापर्यंत सत्ययुगापासून द्वापरयुगापर्यंत अ-उ-म असे जपले गेले, हे कलियुगात ओम अशा विकृत रूपात वापरले जाऊ लागले. तरी ते चुकीचे नाही. जेव्हा आपण अ-उ-म असा उच्चार करतो, अ म्हणजे सकारात्मकता/दैवी ऊर्जेची निर्मिती. उ म्हणजे निर्माण झालेल्या ऊर्जेचे जतन. म म्हणजे प्रणालीमधील नकारात्मक ऊर्जांचा नाश. जेव्हा आपण ओम असा जप करतो, तेव्हा निर्मिती होणार नाही. अ-उ-म चे आणखी एक सौंदर्य आहे. अ,उ,म यांचा उच्चार मुके असलेली माणसंही करू शकतात. जेव्हा तुम्ही अ-उ-म असा उच्चार करता तेव्हा सहस्त्रार चक्र सक्रिय होते. ओम च्या उच्चाराने फक्त पिट्युटरी ग्रंथी सक्रिय होते.

12. प्राणायाम न करता, तो वेळ ध्यानासाठी वापरू शकतो का?

प्राणायामही तितकाच महत्त्वाचा आहे. प्राणायाम केल्याने विचार कमी होतीत. तुम्ही जास्त वेळ ध्यान करू शकता, परंतु त्यासाठी प्राणायाम न करता तो वेळ वापरू नये.

13. ध्यानानंतर आशीर्वाद देण्याचे महत्त्व काय आहे ?

ध्यानानंतर आपण सूक्ष्मस्थितीत असतो. जेव्हा आपण एखाद्याला आशीर्वाद देतो तेव्हा त्यांच्यासाठी सद्भावना, शांती आणि समृद्धीची ऊर्जा पाठवतो. अशा वेळी कृपा तुमच्यावरही होते तसेच, आपली ध्यान करण्याची इच्छाशक्ती वाढते.

14. तंत्राशिवाय, कोणाला नुसते ध्यान करून ज्ञान प्राप्त करणे शक्य आहे का?

तंत्रामुळे धागे मोकळे होतात. ध्यान करताना आपण सुलभतेने कर्म जाळू शकतो. तंत्राशिवाय देखील हे शक्य आहे परंतु यास जास्त वेळ लागतो.